Ad will apear here
Next
प्लास्टिकपासून ‘इकोब्रिक्स’


इकोब्रिक्स नाव ऐकून काही तरी वेगळं वाटेल; पण नागपुरात अनेक महिन्यांपासून टाकाऊ प्लास्टिकपासून ‘इकोब्रिक्स’ बनवणे सुरू आहे. जुई पांढरीपांडे आणि तिची संपूर्ण टीम हे काम करत आहे. 

प्लास्टिकच्या बाटल्या आणि अविघटनशील प्लास्टिक ह्यांचा वापर करून ह्या अभियानाला देशभरात प्रारंभ झाला आणि आज नागपुरातही ह्याची सुरुवात झाली आहे. जुईच्या ह्या कार्याची अनेकांना ओळख व्हावी आणि त्यातून काही प्रेरणा व्हावी ह्या शुद्ध हेतूने हे लेखन केले आहे. 



काल जुई पांढरीपांडे ह्यांच्या टाइमलाइनवर ह्या संदर्भातील व्हिडिओ बघितला. कशा तयार होतात इकोब्रिक्स, हे त्यांनी स्वतः एक लहान तयार करून दाखवलं. बघूनच आश्चर्य वाटलं. अहिल्या मंदिरात गेल्यावरसुद्धा अशा अनेक इकोब्रिक्स बघायला मिळाल्या होत्या; पण तेव्हा त्याबद्दल इतकी माहिती नव्हती; पण व्हिडिओ बघितला आणि त्यातून हे लेखन होतं आहे. 

प्रत्येकाच्या जगण्यात वस्तूंचा वाढता वापर असल्याने टाकाऊ प्लास्टिकचे प्रमाणही खूप जास्त असते. त्यातही सामान्य माणसांच्या वापरात बहुतांश वेळा अविघटनशील प्लास्टिकच असते. कचऱ्यात समाविष्ट झालेले हे कमी जाडीचे प्लास्टिक वर्षानुवर्षे पृथ्वीवर भार बनून राहते. पॉलिथिनसारख्या वस्तूंचे विघटन होण्यास तर ५०० वर्षांपेक्षाही अधिक कालावधी लागतो. या कचऱ्यापासूनच ‘इकोब्रिक्स’ तयार करण्याचा उपक्रम पर्यावरण संरक्षण संस्थेने राबविला आहे.

प्लास्टिकची पाण्याची किंवा शीतपेयाची बाटली याकरिता उपयोगात आणली जाते. त्यामध्ये प्लास्टिक आणि पॉलिथिनच्या वस्तू, तसेच तुकडे, वापरलेले प्लास्टिक खच्चून भरले जाते. असे भरपूर प्लास्टिक भरलेल्या बाटलीला इकोब्रिक असे नाव देण्यात आले आहे. पुनर्वापर आणि पुनर्प्रक्रिया न होणारे प्लास्टिक, वेफर्सची रिकामी पाकिटे, हेअरपिन्स, खाद्यपदार्थांचे प्लास्टिक अशा अनेक गोष्टी यामध्ये भरण्यात येतात; मात्र दुधाच्या पिशव्यांसारखे पुनर्प्रक्रिया होऊ शकणारे प्लास्टिक, सडणारे खाद्यपदार्थ यामध्ये वापरले जात नाहीत. सुमारे शंभर चौरस फूट जमिनीवर पसरू शकेल, इतके प्लास्टिक एका एक लीटरच्या बाटलीत भरता येऊ शकते. अशा भरलेल्या बॉटल्स कचऱ्यात टाकल्या तर कचरा संकलन करणाऱ्यांनाही ते सोयीचे ठरते. याशिवाय, त्यापासून, स्टूल, ट्री गार्ड, पुस्तके ठेवायला कप्पे, बसायला बेंच अशा विविध गोष्टी आकारास येऊ शकतात. 



आज पर्यावरण संवर्धन संस्थेने देशभरात याबाबतचे अनेक प्रयोग सुरू केले आहेत. डेहराडून येथे इकोब्रिक्स बगिचा तयार करण्यात आला आहे. दिल्लीत बचत गटातील महिलांच्या मदतीने इकोब्रिक्स फर्निचर तयार करण्यात आले आहे. रस्तेबांधणीतही त्यांचा उपयोग करण्यात आला आहे. 

सध्या नागपूर येथे विविध सोसायटी, कॉलनीमधील नागरिकांची या कामासाठी मदत घेण्यात येते आहे आणि अनेक नागरिक स्वतः ह्या कार्यासाठी पुढाकार घेत आहेत. अधिक जाणून घेण्यासाठी जुई पांढरीपांडे यांनी शेअर केलेला व्हिडिओ सोबत दिला आहे. 

- सर्वेश फडणवीस




 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/WVCBCU
Similar Posts
‘योजक’ शेतकरी हा बियाणं पेरण्यापासून, त्याचं रुजणं, त्याचं वाढणं, त्याचं डोलणं, असं करत करत ते पीक हाती येईपर्यंतचा सगळा प्रवास स्वतः एन्जॉय करत असतो. तो फार संवेदनशील असतो. त्यामुळे नांगरणी यंत्रांकडून हाताला जाणवणाऱ्या कंपनापेक्षा बैलाच्या पाठीवर हात मारल्यानंतरचं बैलाचं शहारणारं अंग त्याला जास्त सुखावणारं असतं
‘तुम्ही-आम्ही मिळून तापलेल्या पृथ्वीला थंड करायचंय’; तरुणीच्या कल्पनेतून वैशिष्ट्यपूर्ण अॅप विकसित ‘जागृती यात्रा’ या उपक्रमात सहभागी झालेली प्राची शेवगावकर ही तरुणी सोनम वांगचूक यांच्या भाषणाने प्रभावित झाली. त्यातूनच तिला आपला ‘ड्रीम प्रोजेक्ट’ पुढे नेण्याची प्रेरणा मिळाली. ‘कूल द ग्लोब’ हे अॅप तिने तयार केले असून, आपल्या प्रत्येक छोट्या-मोठ्या पर्यावरणपूरक कृतीतून हरितगृह वायूंचे उत्सर्जन किती कमी झाले, याची माहिती त्यात मिळते
टाकाऊ घटकांपासून बनवलेल्या कपड्यांचा अनोखा फॅशन शो पुणे : ‘पुणे तेथे काय उणे’ ही उक्ती सार्थ करत, पुण्यामध्ये चक्क कचरा या संकल्पनेवर आधारित फॅशन शो आयोजित करण्यात आला होता. मिस आणि मिसेस माय अर्थ नावाच्या या फॅशन शोमध्ये प्लास्टिक बाटल्या, प्लास्टिक पिशव्या, इलेक्ट्रॉनिक वेस्ट (खराब झालेले की-बोर्ड, माउस, सीडी, डीव्हीडी) आणि इतर टाकाऊ वस्तूंपासून बनविलेले ड्रेस सादर करण्यात आले
‘उच्च शिक्षणासाठी सामाजिक संस्थांचा हातभार महत्त्वाचा’ पुणे : ‘शेतीविषयक शिक्षणामध्ये नाविन्यपूर्ण बदल केले जात आहेत. सरकारनेही चांगल्या योजना निर्माण केल्या आहेत. शिवाय, आपल्याकडे बहुतांश विद्यार्थी मुख्य व्यवसाय शेती असलेल्या भागातून येतात. मात्र, आर्थिक पाठबळाच्या अभावामुळे त्यांना उच्च शिक्षण घेण्यात अडचणी येतात. अशावेळी सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language